शिक्षण हक्क कायदा 2009

 शिक्षण हक्क कायदा २००९ 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☄ १ एप्रिल २०१० पासून अंमलबजावणी .
☄ ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षणाची हमी.(विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वयाच्या १८ वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची हमी.)
☄ आपल्या पाल्यास शाळेत दाखल करणे हे पालकांचे कर्तव्य .
☄ वयाच्या १४ वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण न झाल्यास त्यानंतरही इ.८ वि पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी.
☄ प्रवेशाच्या वेळी बालक व पालक यांच्या मुलाखतीस प्रतिबंध .
☄ प्रवेशासाठी वयाचा पुरावा सक्तीचा नाही .पूर्वीच्या शाळेचा दाखला नसेल तरीही शाळा प्रवेश .
☄ शाळाबाह्य मुलांना वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश व त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाची सुविधा .
☄ कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध .
☄ बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही.
☄ बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढता येणार नाही.
☄ इ.८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार .
☄ तक्रार निवाराण्यासाठी राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना .
☄ बालस्नेही शिक्षणासाठी भौतिक सुविधांची उपलब्धता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 शाळा व्यवस्थापन समिती गठण 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☄ स्थानिक स्वराज्य संस्था ,शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना .
☄ समितीचा कार्यकाल २ वर्षे ,२ वर्षानंतर पुर्नरचना.
☄ मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांनी शाळा व्यवस्थापन समितीची रचना /पुर्नरचना करण्यापूर्वी पालक सभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक .
☄ समितीची रचना राजकीय /सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील /नियमावलीतील तरतुदींच्या आधारे करावी.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 शाळा व्यवस्थापन समिती रचना 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☄ समितीचे ७५% सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत/म.न.पा./न.पा. सदस्य ,शिक्षक ,शिक्षण तज्ञ किंवा बालविकासतज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश .
☄ किमान ५०% महिला .
☄ पालक सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड ( किमान १ मुलगी.)
☄ पालक सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येईल.
☄ शाळेचे मुख्यध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील.
☄ विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व .
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 शाळा व्यवस्थापन समिती जबाबदाऱ्या व कार्ये
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☄ शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
☄ शिक्षण आपली कर्तव्य पार पाडत असल्याची खात्री करणे.
☄ शाळा शिक्षण हक्क कायद्याशी अनुरुप करणे.
☄ शाळाबाह्य,विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
☄ गावातील /परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
☄ शाळेय पोषण आहार योजना व इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
☄ शालेय मंत्रीमंडळ /बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
☄ शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
☄ शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
☄ शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणाऱ्या अडचणींचे निरसण करुन शाळेचा विकास करणे.
☄ शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
☄ महिन्यातून किमान एक बैठक घेणे,बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करुन देणे .

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 शाळा व्यवस्थापन समितीसाठी मार्गदर्शन सूचना 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☄ शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला किमान एक बैठक आयोजित करावी .
☄ शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नावे फलकावर लावण्यात यावी.
☄ शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व शिक्षकांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा.
☄ समिती सदस्य व शिक्षक यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेच्या सर्वांगिन प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.
☄ शाळेच्या सर्व अर्थिक व्यवहारांमध्ये विहीत प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा. त्यात पारदर्शकता असावी .
☄ शाळेच्या विकासास साहाय्यभूत ठरेल असा शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात यावी.
☄ बालकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
☄ उत्कृष्ट कार्य करणाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य /मुख्याध्यापक/शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा.
☄ विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच शाळेस शासनाकडून मिळणाऱ्या निधीची माहिती अद्ययावत करुन शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावी.
 सारे एक होऊ या 
 शाळेचा विकास घडवू या 


Comments

Post a Comment