संवेदनशील पालक

संवेदनशील पालका कडून संवेदनशील मुख्याध्यापक यांना निवेदन।

टीचर, शिक्षक, गुरु हे जरी शब्द सारखे वाटत असले तरी आज याचे अर्थ मात्र खुप मोठ्या प्रमाणात बदललेल आहे, काळा अनुरूप सर्व काही बदलत गेल आहे, तसेच गुरु चे शिक्षक झाले आणि शिक्षकाचे टीचर झाले, त्याच झपाट्याने शिकवण्याची पद्धतिही बदल गेली।

आ.उ.जा. याचलनाने खरोखर सर्व काही गिळून टाकल आहे, गुरु जरी झाड़ा खाली शिकवायचे तरी त्यांचे खुप चांगले संबंध मुलासोबच त्यांच्या पालकां बरोबर इतर घरातील सर्व सदस्यान बरोबर जिव्हाल्याचे संबंध असायचे, नंतर आमच्या वेळेत शिक्षकांच आपल्या वर्गातील सर्व् मुलांवर नेहमी लक्ष्य असायच सोबत पालकांच्या संपर्कात असायचे, हल्ली तर सर्वत्र टीचर यांची चलती सुरु आहे, काय कराव कस कराव याचा खुप विचार केला जातो, खुद्द टीचर ही हां विचार करतात आणि विद्यार्थी सोबत पालक ही या विचारने त्रासलेले असतात।

जिथे पालकांचाच मुलांबरोबर संवाद खुंटला आहे तिथे शाळेतून अपेक्षा केल जात आहे की मुल घरी सांगतील आणि शाळेतील सर्व वस्तु मुलांना वेळेच्या वेळीच मिळेल। बऱ्याच शाळेत मुलांकडून पालकांसाठी लेखी सूचना पाठवल्या जातात। तरी त्या कड़े पालक लक्ष्य देत नाही। विशेष म्हणजे आज शिक्षकांकड़े सुद्धा मुलांबरोबर बोलायला वेळ नाही, शिक्षक ही आपल्या कामात किती गुंग असतात, मुलांना काय सांगायचं आहे त्या कड़े त्याचं अजिबात लक्ष नस्त त्यांच्या काटे आलेल्या मुलांना ते हिसकाउं लावतात। काय नक्की शिकणार मूल त्यांच्या काडून।

त्याही पलीकडे जाऊन पालकांनी लक्ष्य दिल नाही म्हणून शाळेत मुलांना मारल जात शिक्षा केल जात। शिस्त असलिच पाहिजे त्याला अजिबात नाकरत नाही, पण त्या शिस्तीच् अनुकरण आपण ही केलच पाहिजे, ज्या गोष्टी पालकांना माहितच नाही त्या साठी जबाबदार कोण? ह्या माध्यमाने सर्व शिक्षकांना सांगु इच्छितो की पालकांच्या चुकांची आणि आपल्या कडून न झालेल्या संवादाची शिक्षा मुलांना देऊ नए।

शिक्षकांनी मुलांच्या सिकण्याचा कल लक्ष्यात घेऊन त्या पद्धतिने सिकवाव, त्यासाठी लागणारे कौशल्य स्वतः विकसित करुन घ्याव्यात।

आपल्यात व पालकात असलेल्या कमतरतेची शिक्षा मुलांना कधीच देऊ नए कारण सर्व मुलांना त्यांच्या बुद्धिमत्ते प्रमाणे त्यांच्या आवडी प्रमाणे कळत, फ़क्त तपासयला हव की आपण योग्य पद्धतिने मुलांना कळेल तस प्रयत्न करत आहोत का?

प्रत्येक शिक्षकांनी मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन आपल्या सिकवण्याच्या पद्धतित बदल करणे गरजेचे आहे।

शिक्षकांच्या वागण्याची चुकीची पद्धति ही मुलांच्या मनात शिक्षकांबदल आणि शिक्षणाबद्दल राग व् घृणा निर्माण करते।

आम्ही पालक म्हणून कितीही मुलांना शिक्षक चांगले  आहेत, प्रत्येकाने शिकल पाहिजे अस जरी सांगितल, तरी मुल हे प्रत्येक्ष जे अनुभव करतात त्यावरून ते शिक्षाकान् बद्दल आणि शिक्षणा बद्दल आपली समझ निर्माण करतात। त्या मुळे मुलांच्या अभ्यासा बद्दलची गोडी कमी होत जाते तसेच पालक आणि मुलांन मधे दुरावा निर्माण होत।

शिक्षकांनी मुलांना..
मुलांना मारणे।
ओरडने।
हिनवणे।
किंवा कोणत्या ही प्रकारच शिक्षा करणे।

त्या पेक्षा पालकां बरोबर संवाद साधला तर खुप छान होईल।

मुलांच्या प्रगति मधे शिक्षक आणि पालकांची महत्वाची भूमिका आहे। त्याच महत्त्व समजून घ्यायला हव।

ह्या पुठे आमच्या मुलांना शाळेतून कोणत्याही प्रकारच त्रास देण्याआधी आम्हाला म्हणजेच पालकांना संपर्क करा। पालकांना पाल्या बद्दल सर्व माहिती द्या मुलांच्या विकासासाठी पालकांची मदद नक्की घ्या। पालकांच्या मदती शिवाय जर मुलांना त्रास दिलागेला तर पुठिल होणाऱ्या सर्व प्रकारला शाळा ही सर्वस्व जबाबदार राहणार।

"देश" एक बुलंद आवाज।
9029956626

Comments