संस्कार की शिक्षा

शाळेतून मुलांना दिल्या जाणाऱ्या संस्कार आहेत की शिक्षा?

आपली मुल आपल्याला काही बोलत नाही आणि आपण विचारत ही नाही, शाळेत काय होत आहे? कस वातावरण आहे? सुरुवात कसी करता आणि मधे काय करता? शिक्षक कसे सिकवतात? मित्र मैत्रीण काय करतात? इत्यादि।

खरतर पालकां कड़े वेळच नाही। पण आपल पाल्य नक्की कस आणि काय करत हे आपल्याला माहीत असेलच पाहिजे।

माझ्या मुलीच्या शाळेत प्रवेश झाल्या नंतर 20 दिवसा मधे माझी 8 फेरी शाळेत झाली आहे। नेहमी असेम्बलीच्या आधी पोचतो आणि असेम्बली संपेपर्यंत उभा राहतो, ते सर्व करतो जे ती मुल करतात।
त्यात जाणवल की असेम्बली ही मुलानंसाठी मार्गदर्शक, प्रेरणावर्धक आणि उसफूर्ति दायक असल पाहिजे ते त्यांच्यासाठी कंटाळवाण काम असत। मुलांना ती असेम्बलीची 15 मिनिटे एक शिक्षा सारखी वाटते।

असेम्बलीच्या वेळी आपली मुल हात लांब करुन उभे राहतात त्यावेळी शिक्षक मात्र हाताची घडी घालून उभे असताना दिसले। मुल ही नेहमी अनुकरण करतात, हे शिक्षक जे असेम्बलीच्या वेळी हाताची घडी घालुन उभे असतात ते शिक्षक काय मुल्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतील मुलांना। संस्कार मुलांना सांगून, ओरडून, मारून किंवा चिडून नाही सिकवता येत, "करुन दाखवाव लागत मुल ते बघुन स्वतः सिकतात।"

आपण मोठे झालो म्हणजे आपल्याला सर्व येत अस आहे का? संस्कार हे फ़क्त मुलांसाठीच का? त्यांना संस्कारची गरज नाही का जे शिक्षक तम्बाकू, गुटखा खातात, सिगारेट पितात, दारु पितात, मुलींची छेड़ कड़तात, घरी आणि शाळेत मुलांना मरता, आपल्या बायकोला हिनवतात, महिलांचा आदर करत नाही। संस्कार आणि मूल्य हे बोलून न सिकवता ते आपल्या वर्तवणुकीतून मुलांना त्याची माहिती दिली गेली पाहिजे।

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत जाऊन लक्ष्य दया की असेम्बलीच्या वेळी मुलांना त्रास होईल अस तर त्यांना उभ नाही ना करत आणि जर तस असेल तर तत्काल मुख्याध्यापकांना याची जाणीव करुन दया।

काही मदद लागली तर कळवा -
देश मिश्रा - 9029956626

Comments