बेजबाबदार लोकांची निर्मिती


बेजबाबदार लोकांमुळे बेजबाबदार (गाढवांची) लोकांची निर्मिती...

सरकारचे शिक्षण धोरण तसेच आजची शिक्षण व्यवस्था आणि पालक म्हणून आपली भूमिका या सर्वांवर भविष्यात आपली मुल प्रश्न विचारतील????

आपले सरकार आणि शिक्षण व्यवस्था आज मुलांना गाढव बनविण्याच्या प्रयत्नात आहे. हा माझा आरोप आहेच पण हि आजची सत्य परिस्थिती आहे. आपल्या सरकार ने जे धोरण आज सर्वांसमोर ठेवला आहे त्याने काय निर्माण होणार आहे याची कोणाला काळजी आहे का?

१ ली ते ८ वी च्या मुलांना पास करणे त्यात आकारीत आणि संकलित परीक्षा पध्दती नेबंधनकारक आहे. त्याने मुलांना किती लिहिता वाचता येते हे कळत. तरी त्यावर किती प्रमाणात शाळेत काम केल जात आहे हा मोठ्ठा प्रश्न आहे. कारण ८ वी च्या मुलांना आज लिहिता वाचता येत नाही. हे असून सरकारने ९वि च्या मुलांना हि नापास करायचं नाही असा आदेश दिला आहे त्याच बरोबर १०वी च्या नापास झालेल्या मुलांची जुले मधेच परत परीक्षा घेऊन प्रत्येक मुलांना पास करायचं आहे.

सरकारच्या वेगवेगळ्या व प्रत्येक वर्षी बदलणारे आदेश आणि शिक्षकांच्या उदासीनते मुळे पालक गोधललेले दिसून येतात. सामान्य व दुर्बल पालकांसाठी शिक्षण हे आवाक्याच्या बाहेर च झाल आहे. याचा परिणाम मुलांवर अस झाल आहे कि आजच्या मुलांना प्रश्न विचारता येत नाही, मुल्यांकन करता येत नाही, आत्माविश्वाची कमतरता, आणि खूप महत्वाच आहे कि मुलांना आपल्या मातृभाषेत हि काही लिहिता वाचता येत नाही.

याला पालक जास्त जबाबदार आहेत.

१.      सरकार निवडणारे पालक.

२.      शाळा निवडणारे (English Medium) पालक.

३.      मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणारे पालक.

४.      मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे पालक.

५.      शाळेतून मुलांची प्रगती न तपासणारे पालक.

६.      मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे पालक.

७.      शिक्षकांबरोबर संवाद नाही.

८.      मित्र कोण आहेत पालकांना कळत नाही.

९.      मुलांची संगत कोणासोबत आहे हे जाणून घेत नाही.

१०.  पालकांकडे मुलांसाठी वेळच नाही.

११.  पालक म्हणून कोणालाही जाब विचारल जात नाही.

१२.  पाल्य, पालक आणि शिक्षक यांच्यात चर्चाच होत नाही.

याचा परिणाम आपल्या आजच्या युवा पिठीवर होताना दिसत आहे. काय असणार आपल भविष्य याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.

आपण शाळेत होतो तेव्हा आपले पालक स्वतःची जबादारी म्हणून वरील सर्व मुद्यांपेकी किमान काम केल जात होत जे अता होताना दिसत नाही.

जर त्यांना आपण प्रश्न कस विचारायचं हे शिकवलं तर!!!

Comments