संस्थात्मक विकासासाठी

संस्थात्मक विकासासाठी

संस्थेची कार्यप्रणाली म्हणजे एक वटवृक्षा सारखी असली पाहिजे, संस्थेचे मूल्य, तत्व आणि भूमिका ह्या घट्ट आणि खोलवर गेलेल्या असल पाहिजे आणि म्हणून प्रत्येक संस्थेला वटवृक्षा सारख मोठ होण्यासाठी ही 7 गोष्टी लागतात।

बी - स्टाफ
माती - मुलभुत गरजा
पानी - वेळेवर पगार
वारा - काम करण्यात मोकलीक
प्रकाश - पारदर्शकता
देखरेख - मूल्यांकन, सकारात्मक सूचना
खत - प्रोत्साहन

कोणत्याही गोष्टीच अतिरेक हे धोकादायक असत,

ज्या प्रमाणे कोणत्याही वृक्षाच्या वाढीसाठी प्रथम बी महत्वाची आहे त्याच प्रमाणे संस्थेच्या विकासासाठी स्टाफ खुप महत्वाचे आहे, योग्य स्टाफ निवडणे, आहे त्या स्टाफला टिकवने, त्याच्या विकासासाठी कृति कार्यक्रम करणे, ह्या सर्व प्रकारामुळे स्टाफ टिकतात,

"बी" लावण्यासाठी जसी माती महत्वाची आहे त्याच प्रमाणे आपल्या स्टाफच्या मुलभुत गरजा आणि सामाजिक सुरक्षा दिली गेली पाहिजे,
उदा:- मोकळी व् हवादार खोली, पुरेसी बसायची जागा,  नैसर्गिक विधि करण्यासाठी योग्य आणि पुरेसी व्यवस्था, सामाजिक सुरक्षा मधे पॉलिसी आणि योग्य प्रमाणात सुट्या, ऑफिसच आंनदी वातावरण, सर्वांबरोबर बोलण्याची मोकळीक, संस्थेची उद्दिष्ट आणि दूरदृष्टि ही खुप महत्वाची आहे इत्त्यादि...! हे जर नसेल तर माती बदलावी लागते ते कोणीही बदलू शकतो एक तुम्ही तरी बदलाल किंवा नैसर्गिकरित्या 'बी' जी जागा बदलली जाते.

पाणी जसे रोज दिले जाते त्याच प्रकारे प्रत्येक स्टाफला वेळेवर पगार दिला पाहिजे, जेणे करुन त्यांच्या ठरलेले जे खर्च असतील ते त्याचा नियोजन करु शकतात, काही संस्थे मधे स्टाफला पगार देण्याच्या बाबतीत खुप हलगार्जि पणा करतात, त्यांचा कदाचित स्टाफ वर विश्वाश नसावा, म्हणून काहीही कारणे सांगुन स्टाफचा पगार अर्धा महीना संपायला आल्यावर देतात, जे चांगल नाही, समझा तुम्ही एक झाड़ लाव्लात ते चांगल लागल आहे पण तुमच्या कडून योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणीच दिले नाही तर काय होणार ते झाड़ नष्ट होणार,

वरील बी, माती आणि पानी ज्या प्रकारे महत्वाचे आहेत त्याच प्रकारे झाडाच्या चांगल्या आणि मुळापासून मजबुत वाढीसाठी वाऱ्याचा खुप महत्वाच भाग आहे, तसेच जी संस्था आपल्या स्टाफला वाऱ्या प्रमाणे काम करण्याची मुभा देते त्या संस्थेची प्रगती खुप चांगली होते, या जगात कोणीही एक सारखे नाही प्रत्येक व्यक्ति निराळा आहे, त्याच्या कृति ही निराले आहेत प्रत्येका मधे सृजनशीलता असतेच त्यांना त्याचा वापर करण्यासाठी ची व्यवस्था निर्माण करायला हवी, कारण झाड़ जसा वाढेल त्या प्रमाणे त्याच्या फांदया ही वाढत जातात, त्याच प्रमाणे संस्थेच्या शाखा ही वाढतात,

बी, माती, पानी आणि वारा ज्या प्रामाने महत्वाच आहे तसच प्रकाश ही खुप महत्वाच प्रकाशमुळे ज्या प्रकारे झाडासाठी जेवण बनविला जातो त्याच प्रामाने संस्थेत जर पारदर्शकता असेल तर संस्थेच्या संदर्भातल्या सर्व बाबींवर प्रत्येका कडून चर्चा करुन कोणत्याही समस्येचा समाधान काढता येतो, पारदर्शकता असल्या मुळे संस्था आपली वाटते, संस्थेसाठी प्रत्येक स्टाफ वेळ काल न पाहता काही तरी करु इच्छितो, संस्थेच्या उद्देश्य पूर्तिसाठी स्वतःला वाहून नेहतो, प्रकाश ज्या प्रकारे अंधाराला नाही सा करतो त्याच प्रकारे पारदर्शकता सर्व प्रश्न नाहीस करत।

बी, माती, पानी, वारा आणि पारदर्शकता ज्या प्रामाने महत्वाच आहे तसच देखरेख, काळजी ही खुप महत्वाची आहे झाड़ाला आपण वरील सर्व सुविधा पुरवत असु आणि देखरेख केली नाही त्याची काळजी घेतली नाही तर ते हवा का ढवा वाढेल, त्याच्या वाढीची पाना फुलांची, मातीच्या कसची आणि लागणाऱ्या किड्यं पासुन त्याची काळजी घेतली पाहिजे, हे जर झाल नाही तरी झाड़ नष्ट होऊ सकत, त्याच प्रकारे संस्थेच्या प्रत्येक स्टाफ ची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी ख़ास करुन मानवसंसाधन विकास अधिकारी प्रत्येक संस्थेत नेमला जातो, त्याची जबाबदारी असते प्रत्येक स्टाफच्या चांगल्या आणि खुप चांगल्या गुणा कड़े लक्ष देऊन त्याच्या विकासासाठी उपाययोजना कराव, स्टाफना हव असलेल्या प्रशिक्षणासाठी नेमनूक करावी, त्यांच्या सर्व प्रकारच्या कौशल्याचा वापर करुन संस्थेच्या विकासासाठी हाथभार लावावा इत्यादि।

बी, माती, पानी, वारा, पारदर्शकता आणि देखरेख- काळजी ज्या प्रमाने महत्वाच आहे तसच खुप महत्वाचा आहे झाडाच्या विकासासाठी लागणार योग्य खत, त्याच प्रमाणे त्याची गुणवत्ता तपासून ते झाडाला द्याव लागत, मातीच कस वाढाव, झाडाला पोषक तत्त्व मिळावे यासाठी खत खुप महत्वाची भूमिका बजावत, संस्थे मधे खत हे प्रोत्साहनच्या स्वरुपात आपली भूमिका बजावत, प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेला काही खर्च येत नाही पण हिम्मत मात्र दाखवावी लागते, ते सर्वांना जमत नाही त्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात, ज्या प्रमाणे कोणता खत झाडाला चालत नाही त्याच प्रकारे कोणालाही प्रोत्साहन देता येत नाही, प्रोत्साहन देण्यासाठी खुप मेहनत तर घ्यावीच लगाते सोबत तुमच्या कड़े सकारात्मक विचार ही असल पाहिजे तुमच्या स्टाफसाठी त्याच्या गुणांचा आणि कौशल्याची माहिती असली पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला वेळ द्याव लागतो, आपल्या संस्थेची आणि आपल्या माणसांची काळजी घ्यावी लगाते, नेतृत्वाच विकेंद्रीकरण करव लागत, सर्वांच्या मताने त्यांच्या कौशल्य आणि गुणा प्रामाने जाबाबदारी वाटावी लगाते, कोणतीही गोष्ट आज विचार केला आणि अत्ता होणार अस नसून काही गोष्टिंसाठी वेळ लागतो त्याची तैयारी तुमच्या कड़े असली असली पाहिजे, वरील सर्व मुद्दे आणि तुमच्या अनुभवाच्या वापराने तुम्हीच तुमच्या संस्थेची प्रगती करु सकता,

शेवटी एक सांगेन 100 लोक बादलण्या पेक्षा आपले विचार बदला, पाचच लोकांसाबच काम करा पण त्यांना सोबत घेऊन चला, त्यांना टिकउन ठेवता आले पाहिजे, काम चलाऊ नाते असन्या पेक्षा टिकतील असे संबंध निर्माण करा,

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

दिनेश मिश्रा (देश) -
BA, MSW, MA psychology.
9029956626
Professional Counselor & Trainer.

Comments