इज्जतिचा प्रश्न!!

इज्जतिचा प्रश्न!!

लग्ना आधीच जग कसही असल तरी त्या जगात मी स्वतंत्र होतो.
आपल्या पगारा सोबतच आई वडिलांच्या पैस्यावर मौज करायचो. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न नव्हता.

प्रेमात पडल्या पासून इज्जतीचा पंचनामा होउ लागला.
प्रत्येक कृतीतून माझ्या प्रियसीला माझ्या आणि तिच्या खरच्यांमधून माझी इज्जत दिसू लागली.
त्याला लपविन्यासाठी तिने अजुन खर्च करण्याचा बेत केला. जेणे करुन माझी इज्जत उठावदार दिसणार. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

त्यात कहर तिच्या मित्र - मैत्रीण आणि नाते वाईकांचा, त्यांच्या राहणी - माणीला टक्कर द्यायच म्हणजे किती मोठा पराक्रम करायचा. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

लग्नाआधी केलेल्या वचनांची मायमल्ली होतानाही काही म्हणायच नाही कारण आपली इज्जत आपणच जपायची। कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

मात्र तीने आपल्या प्रत्येक मनास्तापाच्या वेळी कोणतीही स्वप्न पूर्ण केल नाही याची ग्वाही देत राहाच. आणि माझी लायकी दाखउन द्याच, कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

ख़र्चयाच्या गणितात मास्टर आहे, अधिक खर्च केल्याशिवाय समाधान होत नाही. मात्र बचतीच्या नावाने बोम आहे. त्याला ही कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

मित्रांची मुल इंटरनेशनल स्कूल ला जातात म्हणून, आपल्या ही मुलांना त्याच किंवा तस्याच शाळेत घालन्याचा अटाहास, कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

स्वतःच्या लग्ना पेक्षा नातेवायकांच्या लग्नाला खर्च केलाच पाहिजे, त्यापेक्षा आधी केल्याशिवाय लोकांना कळणार कस ते माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

मी दोन वर्षातुन कपड़े घेतल तरी चालेल, कारण मला कोण कुत्र विचारात नाही, मात्र तिने दर 3 महिन्याने 2 च्या सरासरी ने कपड़े घेतलच पाहिजे. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

आपल्यासाठी घरात नीट जेवण नाही केल तरी चालेल, मात्र मित्र मैत्रीण किंवा नाते वाईक आले तर पंच पकवान असणार. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

महीना भर घरात सफाई नसेल तरी चालेल, मात्र मित्र मैत्रीण किंवा नाते वाईक एण्याआधी आवर्जून सुट्टी घेऊन सफाई करायची. कारण माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

प्रत्येक मनास्तापाच्या वेळी एक शब्द, जो माझ्या कानात कोणी तरी शिसम गरम करुन टाकल्या प्रमाणे जातो आणि हॄदयाच्या पटलवार जाऊन ठोका नाहीसा करतो. "तुझ्यामुळे माझ्या आयुस्याच वाटोळ झाल" मला माहित आहे है ती बोलू सकते कारण तिचा माझ्यावर अजुन प्रेम आहे. सेवटी काय तर माझ्या इज्जतिचा प्रश्न आहे.

मला अजुन कळले नाही कधी तिचा प्रेम माझ्या वरुन माझ्या इज्जतीवर सरकला. अस नाही की भाड़ना नंतर ती फुगुन बस्ते, माझी तसिच काळजी घेते, प्रेमाने खायला देते. हव नको त्याची विचार पूस करते. मात्र ती अजुन लोकांच्या विचारांना घाबरते. लोक काय म्हणतिल याची भीति आहे तिच्यात, याची जाणीव होते. म्हणून ती इतका विचार करते. कारण अजुन ही माझ्या इज्जतिचाच प्रश्न आहे.

कस पटउन देउ तिला, माझ्या इज्जती पेक्षा आमच प्रेम महत्वाचा आहे, भविष्याचा विचार महत्वाच आहे, शेवटी कोणी ही येणार नाही माझी इज्जत झाकन्यासाठी तेव्हा ही तिलाच चिंता करावी लागणार. कारण माझ्या इज्जतिचा हा प्रश्न कायम राहणार, त्याला वेगल करुन जगायला हव.

आज केलेल्या प्रत्येक वायफल खरच्यानी आज तरी समाजात इज्जत मिळेलही, मात्र उद्या जेव्हा हातात काही नसेल तेव्हा हेच समाजातील मित्र - मैत्रीण आणि नाते वाईक लोक नाव ठेवायला ही कमी करणार नाही. कारण माझ्या इज्जतिचा जरी प्रश्न असला तरी भविष्याची तरतूद म्हणून आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी कठोर व्हाव लागेल. आज जगायच पण उद्याची ही तरतूद करुन।

हे तेव्हाच बदल सकय आहे जेव्हा दोघांचे विचार एक दिशेला असती. घरच्या प्रगती कड़े असेल. आजच चर्चा करा आणि आपल्या भविष्याची एक दिशा ठरवा इज्जत आपोआप येणार।

धन्यवाद।

Comments