होमस्कूलिंग एक पर्याय!!

दिनांक 2 आणि 3 मार्च 2019 रोजी साने गुरुजी स्मारक ट्रस्ट येथे झालेल्या *होमस्कूलिंग संवाद* यात सहभागी झालो.
माझी मुलगी *शमिता शिल्पा दिनेश* ही 8 वर्षाची आहे, तिच्यासाठी चांगली शाळा शोधण्याच्या प्रयत्नात 4 शाळा बदलल्या.
प्रत्येक पालकांची अपेक्षा असते आपल्या मुलांना बेस्ट देण्याची, तशीच आमची ही आहे. होमस्कूलिंग फक्त ऐकून होतो, तो पर्याय म्हणून कसे वापरता येणार, त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा इथे घेऊन आली.
अपेक्षे पेक्षाही चांगली चर्चा झाली, खुप महत्वाचं जे कळलं ते असं आहे की, होमस्कूलिंग प्रत्येक जण करतात, पण ते शाळेच्या चौकटित करत असतात. फक्त शाळेचा अभ्यास पूर्ण करण्याच्या मागे लागत.
होमस्कूलिंग म्हणजे आपण आपल्या मुलांना वेळ देणे, त्यांना त्यांच्या मतानुसार काम करण्यास वाव देणे.
होमस्कूलिंग म्हणजे मुलांना त्यांचा पूर्ण वेळ त्यांना देणे.
होमस्कूलिंग म्हणजे कोणतेही बंधन न लावता शिक्षण देणे, स्वयं अध्ययनाला वाव देणे.
पहिल्या दिवसाच्या चर्चे नंतर जाणवलं की, आपण ही होमस्कूलिंग करतो फक्त त्याला एक स्वरूप देण्याची गरज आहे.
होमस्कूलिंग चे बरेच फायदे जाणवले ते अशा प्रकारे आहे.
1. मुलांना कोणताही ताण नसतो.
2. स्वयं अभ्यासावर भर दिला जातो,
3. हवा तो आणि हवा तसा अभ्यास करता येतो.
4. उठण्या आणि झोपण्याची कटकट नसते.
5. मुलांकडे आणि पालकांकडे भरपूर वेळ असतो,
6. नैसर्गिक पद्धतीने व निसर्गाच्या सहाय्याने अभ्यास करता येतो.
7. अभ्यास करताना आपले सर्व इंद्रियांचा वापर करता येतो.
8. संस्कारांची गफलत होत नाही.
9. पालकांमध्ये संयम निर्माण होण्यास मदत होते जी की शाळेच्या व्यवस्थेमुळे संपुष्टात आलेली असते.
10. मुलांवर विश्वास ठेवल पाहिजे, ते त्यांच्या परिने पूर्ण करतात
11. मुलांसमोर आपल वर्तन चांगल असल पाहिजे
12. प्रत्येक घटनेट मुलांच मत असत त्याला प्राधान्य देने गरजेच आहे.
13. प्रश्नां ची किती उत्तर येतात पेक्षा किती समझल याचा विचार केला पाहिजे.
14. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कस शोधव त्यासाठी मदद करायला हव सोबतच उत्तर देण्यापेक्षा उत्तर सोधायल मदद करायला हव.
*अलाइंस फ़ॉर सेल्फ लर्निंग* या फोरम बद्दल माहिती मिळाली.
ऑब्जर्व, लिसेन, लर्न एंड अप्लाय हे आपण आत्मसाद करुन मुलांना तस्या पद्धतीने घडन्यास मदद करायला हवी.
काही पुस्तक व यूट्यूब वरील लिंक सूचविन्यात आले.
१. पुस्तकं – तोत्तोचान, Summerhill: A Radical Approach to Child Rearing, The Sudbury Valley School, जिथे मुलांना पंख फुटतात, गिजुभाई बधेगा यांची बुक.
२. Yaacov Hecht ची Democratic Education (इस्राएल)
३. http://www.arvindguptatoys.com/ तसेच यांचे यूट्यूब वर ही वीडियो आहेत.
४. Peter Gray ची Self Directed Learning
मला कळले की *होमस्कूलिंग थोडक्यात योग्य पालकत्व आहे.*

#होमस्कूलिंग

Comments