बाईच बाईच्या जीवावर उठते!

बाईच, बाईच्या जीवावर उठते!
कारण संसाराचा भार हे तिच्याच खांद्यावर असते,
नवरा, सासु, सासरे आणि ननंद यांच्या अपेक्षा गगनाला भीडतात, 
जेव्हा एक बाई सुन म्हणुन बाई प्रत्येकाच्या घरी येते.
संसार तुझा आहे तुझ्या पद्धतिने जग, प्रत्येकाला खुश ठेव अस बाई, बाईलाच म्हणुन जाते,
नवऱ्याला तर क़ाय फक्त भोग हवा असतो,
म्हणुन बाईच बाईच्या जीवावर उठते!
कारण संसाराचा भार हे तिच्या खांद्यावर असते,

जरा काही झाल तर प्रश्न प्रत्येकाला पडतो, 
दिवसभर घरी बसून बाईला दूसरे क़ाय काम असते.
जन्म आणि मृत्युच्या मधल्या फेऱ्यात मात्र, सेवा भाव करणे याच अपेक्षा असल्याने बाईच बाईच्या जीवावर उठते!
कारण संसाराचा भार हे तिच्या खांद्यावर असते,

वडील आणि भावाचा धाक, त्यावर आईने लावली परंपरेची आस,
नवरा झाल्या की लवकरच सर्वांसोबत मिसलण्याची त्याला असते घाई,
बाईच्या मना विरुध्द त्याला सर्व काही मिळवता येई,
मुलांचा जन्म आणि सांभाळ ही तिचीच जबाबदारी होई,
आणि मुलांना जोपासताना तिची धमछाक होई, 
म्हणुन बाईच बाईच्या जीवावर उठते!
कारण संसाराचा भार हे तिच्या खांद्यावर असते,

रीति रिवाज आणि परंपरेच्या तिच्या कडून अपेक्षा,
चुकांना माफी नाही, दिली जाई शिक्षा,
अमानवीय वागणुकीत ही स्वतःला सावरते,
घराची पूर्ण जबाबदारी मरे पर्यंत सांभाळते,
तरी ही म्हणता राव बाईच बाईच्या जीवावर उठते!
कारण संसाराचा भार हे तिच्याच एकटीच्या खांद्यावर असते, तिच्या एकटीच्या खांद्यावर असते।

घ्या जबाबदारी स्वतःला बदलण्याची,
द्या मुभा तिला तिचा मान सम्मान जपण्याची,
तुमच्या इतकच तिला ही कळत,
होत असतील चुका, जसे तुमच्या कडून घडतात,
तिला तिची जागा दखविण्या पेक्षा आपण आपली जागा शोधुया,
मग नाही कोणी म्हणनार बाईच बाईच्या जीवावर उठते!
कारण संसारची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर असते आणि ते सर्वांनी जोपासली पाहिजे.

देश 'एक बुलंद आवाज'

Comments